दामिनी वैदकर आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा
महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेची प्रांताधिकार्यांकडे मागणी
भुसावळ : शहरातील माहेरवाशिण असलेल्या दामिनी वैभव वैदकर हिच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेतर्फे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन देवून करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचे जिल्हा नेते एस.एस.अहिरे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.
फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा
भुसावळ शहरातील माहेर असलेल्या व पेशाने माध्यमिक शिक्षक असलेल्या आर.आर.धनगर यांची मुलगी दामिनी वैभव वैदकर हिने 27 ऑगस्टला जळगावात सासरचा छळ व जाचाला कंटाळून जीवन संपवले. दामिनीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचे तिच्या आईचे म्हणणे आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कारवाई करावी, आरोपींना कठोर शिक्षा करावीख पीडीत शिक्षक कुटुंबाला न्याय द्यावा, अशी समस्त शिक्षक वर्गाची या निवेदनाद्वारे मागणी आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. महिला, मुली व पालकांच्या मनात अशा घटनांमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दामिनी वैदकर आत्महत्या प्रकरणी संबंधित आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे प्रांत अधिकार्यांकडे करण्यात आली आहे..



यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदन देतेवेळी जिल्हा नेते एस.एस.अहिरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस.नेमाडे, भुसावळ माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे मानद चिटणीस विकास व्ही.तळेले, वराडसीम येथील पंडित नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक सुशीलकुमार खेडकर, सुनील वानखेडे (वरणगाव), अश्विनकुमार इंगळे, पी.आर.घोगरे, के.पी.पाटील, एन.डी.राजपूत, गोविंदा पाटील (शेलवड) उपस्थित होते.


