भुसावळातील धावपटू आर.बी.भंवर यांना भुसावळ रनर्सतर्फे श्रद्धांजली


भुसावळ : शहरातील आंतरराष्ट्रीय धावपटू स्व.आर.बी.भंवर यांचे नुकतेच वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजलीपर विशेष दहा किलोमीटरच्या रनचे आयोजन भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे रविवारी करण्यात आले. रविवारी सकाळी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून सकाळी सहा वाजता शहरातील धावपटूंनी धावायला सुरुवात केली. आरपीडी रोडवरून झेडटीएसपर्यंत व तेथून पुन्हा मैदानावर परत असा रनचा मार्ग होता. त्यानंतर स्ट्रेचिंग एर्क्ससाइज घेण्यात आली. भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक यांनी दिवंगत भंवर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी डॉ. स्वाती फालक, पूनम भंगाळे, डॉ.चारुलता पाटील या महिला धावपटूंनीदेखील सहभाग नोंदविला. यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ उपस्थित होते. या रनमध्ये मुकेश चौधरी, तरुण बिरीया, संतोष घाडगे, अजय अंबेकर, गणसिंग पाटील, प्रकाश अटवाणी, जय मनवानी, अशोक पाटील, निर्मल बलके, विजय पाटील, विलास पाटील, निलेश लाहोटी, अंकित पोद्दार, प्रवीण वारके, रंजीत खरारे, सारंग चौधरी, महेश फिरके, प्रवीण पाटील या धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !