वरणगावात विवाहितेची विष पिऊन आत्महत्या


वरणगाव : शहरातील विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना घडली. जान्हवी दिलीप झोपे (29) असे मृत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. जान्हवीने शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घराच्या मागील खोलीत जाऊन विषारी द्रव प्राशन केले. नातेवाईकांनी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या पश्चात पती, मुलगा असा परीवार आहे. चंद्रशेखर झोपे यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !