वरणगाव पोलिसांनी केला 16 हजारांचा गुटखा जप्त : व्यापार्‍याला अटक


वरणगाव : वरणगाव पोलिसांनी शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पिंपळगाव येथे हरी किटकुल बढे माध्यमिक विद्यालयाजवळ सुनील संत माळी (रा.जावळे वाडा, वरणगाव) यांना 16 हजारांच्या गुटख्यासह पकडले. संशयीत माळी हे बोदवडकडून मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 डी.आर.6461) वरून वरणगावकडे गुटखा घेऊन येत असताना पोलिसांनी कारवाई केली. माळी यांच्याविरोधात वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !