श्री विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही ; कृत्रिम हौदात करावे विसर्जन -विशेष महानिरीक्षक बी.जी.पाटील


भुसावळ : सध्या कोरोनाचा काळ सुरू असून एका व्यक्तीचे प्राण वाचविल्यास मोठे पुण्य मिळते त्यामुळे गणेशेात्सवात चांगले उपक्रम राबवावेत शिवाय पोलीस हे सज्जनांना नमस्कार करतील मात्र गुन्हेगारांना कायद्याची लाठी दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. यंदा गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीसह डीजेला परवानगी नाही त्यामुळे सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी येथे केले. संतोषी माता हॅालमध्ये शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह डीजे व्यावसायीक आणि शांतता कमिटीच्या सदस्यांच्या बैठक रविवारी सायंकाळी सहा वाजता झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची व्यासपीठार उपस्थिती
व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आदी उपस्थित होते.




गुन्हेगार हद्दपार होणार ; पोलीस उपअधीक्षक
शासनाने काढलेल्या आदेशाचे आपणा सर्वांना पालन करायचे आहे. एक गाव एक गणपती ही संकल्पना आपण अंमलात आणणार होता, मात्र पदाधिकार्‍यांकडून पाहीजे तसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना राबवावी, असे आवाहन त्यांनी केले. गणेशेात्सवाच्या काळात जे उपद्रवी आहेत त्यांना शहरबंदी केली जाणार असून 38 जणांचे प्रस्ताव पाठविले आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक दिलीप भागवत तर निरीक्षक प्रताप इंगळे यांनी आभार मानले.

कृत्रिम हौदात करा विसर्जन
घरांमधील गणेश मूर्ती, मंडळाच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी पालिका कृत्रिम हौद ठेवणार असून त्यात श्रींचे विसर्जन करावे वा ज्यांना विसर्जन करण्यास नदीवर जायचे आहे, त्यांनी तेथे विसर्जन करावे, असे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

उभ्या डीजेवर कारवाई कशी? : आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, यापूर्वीच्या अधिकार्‍यांनी उभ्या असलेल्या डीजे व्यावसायीकांचे डीजे जप्त करून त्यांच्याविरूध्द कारवाई केली. उभ्या असलेल्या डीजेवर कारवाई करणे हे कुठल्या कायद्यात आहे? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित करीत पोलीस अधिकार्‍यांनी डीजे व्यावसायीकाचा प्रश्न मार्गी लावावा, टेक्निकल मुद्दा धरून मधला मार्ग काढावा असे आवाहन त्यांनी केले.

अन् डीजे व्यावसायीक परतले
उत्सवात डीजे वाद्याला व मिरवणुका काढण्यास परवानगी नाही शिवाय , असे पोलीस प्रशासनाने सांगताच डीजे व्यावसायीक यांनी माईक हातात घेऊन आम्ही डीजेसाठी बॅकेचे कर्ज काढले आहे, कोरोनामुळे ते भरता आले नाही, आता मिरवणूकीत सुध्दा ते वाजवू देणार नाही, त्यामुळे आम्ही कर्ज कसे फेडायचे, बेरोजगारी वाढत आहे. असे सांगितल्यावर सर्वच डीजे व्यावसायीक यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत बैठकीतून काढता पयत घेतला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजावून सांगितल्यावर ते बैठकीत परतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !