भुसावळात महिलेची पर्स लांबवली
भुसावळ : मेडिकल दुकानावर औषधी घेण्यासाठी आलेल्या महिलेची अज्ञात भामट्याने पर्स लांबवली. पर्समध्ये सातशे रुपयांची रोकड व पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल होता. ही घटना रविवार, 5 रोजी दुपारी सव्वा दोन वाजता ही घटना घडली. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आशा सूर्यकांत जावळे (63, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ) या शहरातील आठवडे बाजार भागातील चंदन मेडिकलवर आल्या असता चोरट्याने त्यांची पर्स लांबवली. या पर्समध्ये पाच हजार रुपये किंमतीचा लिनोव्हो कंपनीचा मोबाईल तसेच सातशे रुपयांची रोकड होता. रविवारी रात्री उशीरा या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक गोपाळ गव्हाळे करीत आहेत.





