लव्ह जिहादच्या समूळ उच्चाटनासाठी कठोर कायद्यांची गरज : सुनील घनवट
भुसावळ : ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुली, युवती आणि महिला यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’चे समूळ उच्चाटन करण्यासाठी इस्रायलप्रमाणे कठोर कायदे होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी केले. 5 सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘लव्ह जिहाद : एक धर्मविरोधी षड्यंत्र’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यानात ते बोलत होते. नगर जिल्ह्यातील रणरागिणी शाखेच्या प्रतीक्षा कोरगावकर यांनी ‘हिंदू युवतींना स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रागेश्री देशपांडे यांनी केले.
भावनिक आधार गरजेचा
घनवट पुढे म्हणाले की, पालकांनी मुलांना अनिर्बंध स्वातंत्र्य दिल्याने त्यांचे जीवन धोक्यात येत आहे. मुलींच्या भावनांचा आदर करून त्यांना भावनिक आधार देणे आवश्यक आहे. मुलींना धर्माचरण शिकवल्यास त्यांच्यातील आध्यात्मिक सामर्थ्य वाढण्यास साहाय्य होते. एकही हिंदु युवती ‘लव्ह-जिहाद’ला बळी पडणार नाही, असा निश्चय करा, असे आवाहन त्यांनी केले.




