भुसावळात महिला-भगिनींनी नगरसेवक पिंटू ठाकूर यांना बांधली राखली
महिला-भगिनींच्या संरक्षणासह प्रभागाच्या विकासाची दिली ग्वाही
भुसावळ : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण नुकताच शहरातील दीनदयाल नगरात साजरा झाला. प्रभागाचे नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांना महिला व भगिनींनी यावेळी राखी बांधली. यावेळी ठाकूर यांनी माता-भगिनी, महिलांच्या संरक्षणासह प्रभागाच्या विकासाची ग्वाही दिली तसेच भगिनींना साडी भेट देत त्यांचे आशीर्वाद घेतले.
भगिनींच्या संरक्षणासाठी कटीबद्ध
यावेळी नगरसेवक ठाकूर म्हणाले की, माता-भगिनींच्या रक्षणासाठी आपण कटीबद्ध असून नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. तुमच्या समस्या व दुःख काहीही असो मला तुमचा पाठिराखा भाऊ सांगा, निश्चित मी मदतीसाठी तयार असेल, असेही ठाकूर म्हणाले. वॉर्डातील शेकडो महिला-भगिनींनी ठाकूर यांना राखी बांधत आशीर्वाद दिले. पिंटू ठाकुर हे आमच्या वॉर्डाचे काळजी वाहू नगरसेवक आहेत व प्रत्येकांच्या सुख दुःखात सदैव हजर राहतात. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते दीपक काठे यांनी केले. गेल्या 30 वर्षात अनेक नगरसेवक बघितले परंतु असा पिंटू ठाकुर यांच्या रूपाने वॉर्डाला खरा जनसेवक मिळाला असून त्याचा सार्थ अभिमान वाटतो.



यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
यावेळी चंदू बडगे, प्रवीण परदेशी, आकाश राजपूत, निखील वाणी, प्रवीणसिंग राजू पाटील, अक्षय सोनवणे, हर्षल कोळी, निलेश ठाकूर, विजय ठाकूर, गोकुळ सोनार, शुभम भावसार, गोकुळ पाटील, सुरज वराडे, रोशन मिस्त्री, संजय शिरसाठ , कडू सोनार आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी नितीन मराठे, चंद्रकांत बडगे, विकास राखुंडे, अरुण धनगर, प्रदीप सपकाळे, प्रवीण पाटील, पिंटू खंडाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.


