रावेरकरांना ‘फ्लूने’ केले हैराण


खाजगी व दवाखाने रुग्णांच्या गर्दीने झाले फुल्ल : रविवारीदेखील वाढली गर्दी

रावेर : रावेर शहरासह परीसरात मोठ्या प्रमाणात फ्लूची साथ पसरत असल्याने रविवारीदेखील शहर व तालुक्यातील खाजगी दवाखाने रुग्णांच्या गर्दीने फुल्ल झाले आहेत. प्रत्येक गावात सर्दी, पर्स, ताप, डोके दुखणे आदी लक्षणे जाणवत असलेल्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. तसेच खाजगी दवाखान्यांसह ग्रामीण रुग्णालयात सुद्धा रुग्णांची गर्दी वाढली आहे. फ्लूची घरात एका व्यक्तीला लागण झाल्यास तातडीने कुटुंबातील दुसर्‍या सदस्यालादेखील लागण होत आहे.

साथीत घ्यावयाची खबरदारी
पाणी गाळून प्यावे, स्वच्छता राखावी तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे तसेच खोकलतांना रुमाल वापरावा व लगेच डॉक्टरांना दाखवावे अश्या सूचना डॉक्टरांतर्फे करण्यात आल्या आहेत.
अस्वच्छते अभावीदेखील अनेक रोग पसरतात. गत दोन तीन दिवसानपासून फ्लूचे अनेक रुग्ण आढळत आहेत. फ्लू झाल्यानंतर सर्दी, खोकला, ताप हमखास येतो शिवाय एकास झाल्यास त्याच्या संपर्कात येणार्‍या दुसर्‍या व्यक्तीलादेखील फ्लूची लागण होते.




हॉस्पिटल फुल्ल : काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन
सर्दी, खोकला व ताप मोठ्या प्रमाणात लहान मुलांना जाणवत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या व्यक्तीला सुध्दा अशी लक्षणे जाणवत असून रावेर शहरातील सर्व हॉस्पिटल रुग्ण संख्येने फुल्ल झाले आहेत. तास न् तास रुग्ण नंबर लावून रुग्णालयात थांबून आहेत. फ्लू टाळण्यासाठी घरातच रहावे बाहेर व गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !