राज्य टेनिस बॉल स्पर्धेत जिल्हा संघाला अजिंक्यपद


भुसावळ : महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे नागपूर येथे झालेल्या 17 व्या सब-ज्युनियर राज्य अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने यजमान नागपूर संघावर अंतिम सामन्यात चार धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत जिल्हा संघाने सलग सहा सामने जिंकले. विजेत्या संघातील खेळाडूंची शिबिरानंतर जम्मू येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

चषक देवून खेळाडूंचा सन्मान
नागपूर येथील कलोडे महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या 17 व्या सब-ज्युनियर राज्य स्पर्धेत पहिल्या सामन्यात जळगाव संघाने सांगली संघावर 8 गडी राखत मात केली. दुसर्‍या सामन्यात धुळे संघांवर 30 धावांनी विजय मिळवला. तिसरा सामना नागपूर शहर विरुद्ध झाला. या सामन्यात जळगाव संघाने 6 गड्यांनी नागपूर शहरावर मात केली,. चौथ्या सामन्यात नागपूर ग्रामीण संघावर 5 गड्यांनी मात केली. पाचव्या उपांत्य सामन्यात अकोल्याला 6 गड्यांनी नमवले तर अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात यजमान नागपूर जिल्हा संघावर जळगाव जिल्हा संघाने चार धावांनी मात करत अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा आपल्या नावे कोरली. यापूर्वी जळगाव संघाने 2014- नाशिक, 2015- अमळनेर, 2016- मुंबई अशी सलग तीन वर्षे अजिंक्यपद स्पर्धा पटकावली होती. जम्मू येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी
विजय संघातील खेळाडूंची अंतिम निवड शिबिरानंतर केली जाणार आहे.
विजयी संघाला राज्य संघटनेचे सचिव डॉ.मोहम्मद बाबर, संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.बाबूलाल धोत्रे, उपाध्यक्ष व जिल्हा सचिव वासेफ पटेल, गिरीश पांडव, मनोज जाधव यांच्याहस्ते चषक देऊन सन्मानीत करण्यात आले.




यांचा राहिला विजेत्या संघात समावेश
विजेत्या जळगाव जिल्हा संघाचे कर्णधार- लोकेश पाटील, आयुष पाटील, कृष्णा महाजन, हर्षवर्धन भोईटे, कौशल भोई, प्रणव चव्हाण, महेश पाटील, गणेश पाटील, हेमराज अहिरराव, अभिजीत निनायदे, निरज सोनवणे, प्रशिक्षक अरविंद जाधव , व्यवस्थापक विजय पाटील, जळगाव शहर संघ प्रेम भावसार, रोहित बिर्‍हाडे, संस्कार सांगोरे, आदित्य पाटील, वैभव सोनवणे, अनिस तडवी, साहिल तडवी, मिरझान तडवी, तन्वीर तडवी, राहुल जाधव, अजिंक्य पाटील, अबुजर पटेल, प्रशिक्षक साजीद तडवी व्यवस्थापक तारेक पटेल, प्रशिक्षक मनोज जाधव, अरविंद जाधव टीम मॅनेजर विजय पाटील होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !