भादलीतील विवाहितेचा 50 हजारांसाठी छळ
जळगाव : माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने भादली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी भुसावळ तालुक्यातील साकरी येथील पतीसह सासू व सासर्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
50 हजार रुपये न आणल्याने छळ
तालुक्यातील भादली बुद्रुक येथील माहेर असलेल्या प्रतिमा रविंद्र पारधे यांचा विवाह भुसावळ तालुक्यातील साकरी येथील रवींद्र रामा पारधे यांच्याशी 21 जून 2012 रोजी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नानंतर एक मुलगी झाली. त्यानंतर मुलांचे पालन पोषण करण्यासाठी माहेरहून 50 हजार रूपये आणावे यासाठी पती रवींद्र पारधे यांनी मारहाण केली. तर सासू दगडाबाई रामा पारधे आणि सासरे रामा गणपत पारधे (साकरी, ता.भुसावळ) यांनी विवाहितेला आणि वडीलांना शिवीगाळ केली. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी भादली बुद्रुक येथे निघून आल्या. याप्रकरणी विवाहितेने 7 सप्टेंबर रोजी पतीसह सासू व सासरे यांच्याविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




