अहिरवाडीतून दोन म्हशींची चोरी
रावेर : तालुक्यातील अहिरवाडी गावातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन म्हैशी लांबविल्या. पशूधनाच्या चोरीमुळे शेतकर्यांमध्ये भभतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अहिरवाडी (ता रावेर) येथील तुळशीराम धनगर यांच्या दोन म्हैशी गोठ्यात बांधलेल्या असताना मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पावणेदोन लाख रुपये किंमतीच्या दोन म्हशी लांबवल्या. चोरीची माहिती मिळताच भाजपा पदाधिकारी संदीप सावळे यांनी घटनास्थळी भेट दिली.





