पुरस्काराने नव्हे तर कर्मातून माणुस होतो मोठा


माजी प्राचार्य आर.ए.वाघ : वरणगावात भाजपातर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान

वरणगाव : पुरस्कार मिळवून माणूस मोठा होत नाही तर तो त्याच्या कर्मातून मोठा होत असतो आणि तोच पुरस्कार सर्वात मोठा असतो. पैसा, धन हे शिक्षकाची संपत्ती नसून माझा विद्यार्थी माझ्या गावाचा नगरसेवक झाला, विविध क्षेत्रात उच्च पदावर गेला हीच खरी संपत्ती आहे, असे विचार माजी प्राचार्य आर.ए.वाघ यांनी व्यक्त केले. वरणगाव भाजपातर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

माजी नगराध्यक्ष काळेंमध्ये गावाला पुढे नेण्याचे व्हिजन
माजी प्राचार्य वाघ म्हणाले की, माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचे काम गौरवास्पद आहे. त्यांच्यात गावाला पुढे नेण्याचे व्हीजन आहे. मंत्री मंडळात जाऊन माझ्या गावासाठी निधी द्या ही धळपळ कमी लोकांमध्ये असते. समाजाने माझे गाव विकासाच्या दृष्टीने पुढे कोण नेईल ? अश्या व्हिजन असणार्‍यांबरोबर राहिले पाहिजे, असेही माजी प्राचार्य वाघ म्हणाले.




यांची कार्यक्रमास उपस्थिती
भाजपाच्या वतीने वरणगाव येथे रविवार, 5 सप्टेंबर शिक्षकदिनानिमित्त माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शिक्षकांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. यावेळी बी.एम.राठोड, विलास तायडे, मधुकर वानखेडे, अनिल देशपांडे, सुवर्ण तायडे-जंजाळे, किरण आहिर, व्ही.वाय.चौधरी, अनिल बाविस्कर, सतीश इंगळे, आर.डी.पाटील, प्रा.भागवत पाटील, सुनील पाटील, प्रा.निंबोळकर, पी.एन.सोलंके, आर.एस.सोनवणे आदींची उपस्थिती होती. उपस्थित शिक्षकांचे पूजन करून भागवत गीतेचा ग्रंथ यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाध्यक्ष सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, मिलिंद भैसे, रमेश पालव, अनिल वंजारी, महिला मोर्चा अध्यक्ष प्रणिता पाटील- चौधरी, योगेश माळी, आकाश निमकर, पप्पू ठाकरे, रॉक कश्यप, कमलाकर मराठे, विशाल कुंभार, मंगेश कुंभार, सुमित तायडे, नरेंद्र बावणे, रामदास बावणे, राहुल जंजाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हा तर प्रामाणिक शिक्षकावर अन्याय : सुनील काळे
माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, जिल्हा परीषदेने आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड करताना राजकारणी, लोकप्रतिनिधी ज्या शिफारसी करता त्या न जुमानता प्रामाणिक काम करणार्‍या शिक्षकाची निवड करावी. पुरस्कारातील राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबला पाहिजे आणि प्रस्ताव मागणे ही पद्धत मुळात चुकीची असून जिल्हा परीषदेने समिती गठीत करून त्या समितीने शिक्षकांच्या कामाच्यो मूल्यमापनाच्या आधारावर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला पाहिजे त्यामुळे खर्‍या शिक्षकाला राजकारण्यांच्या आशीर्वादाची गरज पडणार नाही.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !