वरणगावात सर्व जलद बसेसला थांबा द्यावा
विभाग नियंत्रक जगनोर यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंची मागणी
वरणगाव : शहराच्या बाहेरून बायपास झाल्यामुळे इतर जिल्ह्यातील जलद बसेस या वरणगाव शहरातून न जाता न थांबता थेट बायपासवरून जात असल्याने वरणगावकरांचे हाल होत आहेत. या संदर्भात् विभाग नियंत्रक भगवान जगनोर व सहाय्यक बंजारा यांना जळगाव येथे भेटून माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, भाजपा शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, कमलाकर मराठे यांनी प्रत्यक्ष भेटून केली.
कायमस्वरुपी कंट्रोलरही हवा
डी.सी.जगनोर यांच्याशी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी या दरम्यान वरणगाव शहरातून जाणार्या सर्व अति जलद बसेसला थांबा देण्यात यावा तसेच बसस्थानक चौफुलीवर वरणगाववरून जाणार्या येणार्या बसेसचे वेळापत्रक लावण्यात यावे तसेच वरणगाव चौफुलीवर कंट्रोलर कायमस्वरूपी नेमण्यात यावा जेणेकरून बसच्या विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीकांच्या सर्व पासेस वरणगाव येथूनच वितरीत कराव्यात आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. भगवान जगनोर यांनी वरणगाव शहरातून सर्व अतिजलद बसेसला थांबा देण्यासाठी सूचित करण्यासह व कंट्रोलर नेमणुकीचे आश्वासन दिले.




