सावद्यात गुरांचा कंटेनर पकडला : 30 गायींची सुटका
सावदा : कत्तलीच्या इराद्याने गुरांची वाहतूक होत असलेला कंटेनर सावदा पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पकडल्याने अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. रीलायन्स पेट्रोल पंपाजवळ कंटेनर आल्यानंतर पोलिसांनी तो पकडताच कंटेनर चालक पसार झाला. यावेळी या कंटेनरमध्ये सुमारे 30 वर गायी आढळल्याने त्यांची सुटका करण्यात आली व या गायींची जळगावच्या बाफना गो शाळेत रवानगी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.





