रावेर पंचायत समितीची बैठक पाच सदस्य व सह्याजीरावांमुळे चर्चेत
रावेर : रावेर पंचायत समितीची मासिक आढावा बैठक मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत व सह्याजीरावांमुळे चांगलीच चर्चेत राहिली.आधीच एक वाजेची बैठक दोन वाजता सुरू झाली. ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी शासन दरमहा मासिक बैठक घेत असते परंतु निवडणूक तोंडावर असतांना सदस्यांची दांडी चर्चेचा विषय ठरला.
सह्या करून सदस्या माघारी फिरले
रावेर पंचायत समितीत गुरुवारी मासिक आढावा बैठक सभापती कविता कोळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीची नियोजित वेळ दुपारी एकची होती परंतु दुपारी दोन वाजता बैठक घेण्यात आली. मासिक बैठकीला सात सदस्य उपस्थित राहणे अनिवार्य असतांना सदस्य पी.के.महाजन व योगेश पाटील यांनी उपस्थित असल्यावर सुद्धा स्वाक्षर्या करून बैठकीतून काढता पाय घेतला. आढावा बैठकीला पंचायत समिती सदस्य जितु पाटील, दीपक पाटील, जुम्मा तडवी, योगीता वानखेडे उपस्थित राहिल्या. संपूर्ण बैठक पंचायत समिती सदस्य व सह्याजीरावांमुळे चर्चेत राहिली.




