भुसावळात श्री गणेश मूर्ती बनवण्याबाबत कार्यशाळा
भुसावळ : शहरातील गोविंद कॉलनीतील श्री ब्रह्म चैतन्य निवासस्थानात प.पू.श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहजयोग परीवारातर्फे शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्यिाबाबत नुकतीच विनामूल्य कार्यशाळा झाली. प.पू.माताजी निर्मला देवी यांनी सहजयोग हा सर्वसामान्यांच्या उथ्थानाच्या उदात्त हेतूने सुरू केला आहे. सहजयोग हीध्यान-धारणा करण्याची सोपी पद्धत आहे व ही पद्धत प.पू.श्री माताजी निर्मला देवी यांनी विकसीत केली आहे. या ध्यान पद्धत्तीत आपल्यातील कुंडलिनी शक्ती प.पू.श्री माताजी निर्मला देवी यांच्या कृपेने सहजच जागृत होवून साधकास याची अनुभूती आपल्या हाताच्या बोटांच्या अग्रांवर तसेच टाळूवर होते. ही ध्यान-धारणा नावाप्रमाणेच सहज
सहज आहे, म्हणजे आपण आपल्या रोजच्या कामात काहीही बदल न करता थोडा वेळ रोज ध्यान कारावे. या ध्यानामुळे – आपल्यातील रोग प्रतीकारक शक्ती वाढते तसेच प्रकृतीत सुधारणा होवून एकाग्रता वाढते, व्यसनांपासून सुटका होते, आर्थिक परीस्थीती सुधारते, घरात शांतता नांदते, आपल्यातील सुप्त कलागुण विकसीत होतात त्यामुळे विद्यार्थांची अभ्यासात प्रगती होते यासह अनेक फायदे आहेत. सहजयोगाच्या अधिक माहिती साठी 18002700800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.





