भुसावळातील वर्षा ललवाणी यांचे खडतर जैनधर्मीय 11 उपवास


भुसावळ : भुसावळातील श्री श्रावक संघाचे माजी कोषाध्यक्ष मदनलाल ललवाणी व कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांच्या स्नुषा वर्षा सुयश ललवाणी यांनी प.पू.आचार्य देव विजय प्रभाकर सुरीश्वरजी म.सा. व प.पु. साध्वी प्रज्ञाप्ताश्रीजी, अमितमालाश्रीजी, रत्नशिलाश्रीजी, विनम्रयशाजीश्री यांच्या अनुकंपा व आशीर्वादाने जैनधर्मीय 11 खडतर उपवास केले. पुर्णाहुतीनिमित्त अनुमोदन सोहळा इंटरनॅशनल भक्ती संगीत सम्राट विनीत गेमावत यांच्या उपस्थितीत होणार आहे. वर्षा ललवाणी या उच्चशिक्षीत असून त्यांनी प्रथमतः 11 उपवास केले. यांच्या या धार्मिक अनुष्ठानाबद्दल श्रावक संघ, भुसावळ, श्री श्रावक संघ, ठाणा, जैन युवक मंडळ, संयुक्त सेवा महिला मंडळ, नवकार ग्रुप, सखी सहेली ग्रुप, श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ, श्री ऋषभदेव महारा, जैन धर्म टेंपल अ‍ॅण्ड ज्ञाती ट्रस्ट, पांडव ग्रुप व तसेच अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले. भुसावळातील ललवाणी परीवार हा सदैव तपस्या व धार्मिक कार्यात अग्रेसर असतो असे स्वाध्यायी, जैन कान्फ्रन्स दिल्लीचे ज्ञानप्रकाश योजनेचे माजी अध्यक्ष प्रेमचंद कोटेचा म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !