जळगावात पित्याचा मुलाने केला खून : दोघे संशयीत मुले ताब्यात


जळगाव : चाकूचे सपासप वार करीत मुलांनीच पित्याचा खून केल्याची घटना शहरात रविवारी घडल्याने खळबळ उडाली. प्रेमसिंग अभिसींग राठोड (50) असे मयताचे नाव आहे. खुनाचे नेमके कारण अस्पष्ट असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानतंरच कारण स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. खून प्रकरणी संशयीत गोपाळ राठोड व दीपक राठोड यांना ताब्यात घेण्यात आले आहे

चाकू हल्ल्यात मृत्यू
निमखेडी शिवारात वास्तव्यास असलेल्या प्रेमसिंग अभिसींग राठोड (50) यांचा मुलांशी कुठल्यातरी कारणावरून रविवारी सकाळी वाद झाल्यानतर मुलगा गोपाळ व दीपक प्रेमसिंग राठोड यांनी वडिलांच्या पोटावर चाकूने सपासप वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही क्षणांमध्ये झालेल्या या प्रकारामुळे परीसरात खळबळ उडाली. जळगाव तालुका पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन गोपाळ राठोड व दीपक राठोड यास ताब्यात घेतले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहा.पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जळगाव तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट देत माहिती जाणून घेतली.




जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍याची सतर्कता
खून घडत असतानाच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी श्यामकांत बोरसे हे सिव्हील ड्रेसवर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी जात असताना त्यांना खुनाचे दृश्य दिसताच त्यांनी धाव घेतली. दोघा संशयीत आरोपींना त्यांनी तातडीने ताब्यात घेत तालुका पोलीस ठाण्यात आणल्याचे सूत्रांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !