यावल शहरात संदेश यात्रेचे स्वागत


यावल : शहराच्या भुसावळ टी पाँईट चौकात रविवारी कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून स्वराज्य ध्वज कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यात भ्रमण करणारी संदेश यात्रा काढण्यात आली असून या यात्रेचे शहरात आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात आले. आपला भारत हा समृद्ध व वैभवशाली ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा असलेला देश आहे. कर्जत-जामखेडनजीक शिवपट्टण किल्ला असून याच किल्ल्याजवळ हिंदवी स्वराज्यातील शेवटची लढाई झाली व शत्रूला धुळ चारत आपल्या शुर मावळ्यांनी त्यावर भगवा फडकवला होता. आता या किल्ल्याच्या आवारात प्रेरणा, ऊर्जा देणारा भव्य असा स्वराज्य ध्वजस्तंभ साकार होत आहे. देशभरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी प्रातिनिधीक पूजन झाल्यानंतर साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसर्‍याच्या मुुहुर्तावर या ध्वजाची प्रतिष्ठापना होवून 15 ऑक्टोबर रोजी हा स्वराज्य ध्वज उभारला जाणार आहे.

राज्यभरात सर्वसमावेशक ध्वजाचे पूजन
या स्वराज्य ध्वजस्तंभाची उंची 74 मीटर, स्तंभाचे वजन 18 टन, स्वराज्य ध्वजाचा आकार नऊ हजार 664 फूट तर स्वराज्य ध्वजाचे वजन हे 90 किलो आहे. याकरीता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात सर्वसमावेशक ध्वजाचे पूजन सर्वांच्या हस्ते होण्याची लोकभावना असल्यामुळे महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध ठिकाणी या ध्वजाचे पूजन होत आहे. या दृष्टीकोणातुन 37 दिवसाच्या या प्रवासात स्वराज्य ध्वज पूजन यात्रा सहा राज्यातून 12 हजार किलोमीटर प्रवास करीत यावल शहरात पोहोचली.




यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी ध्वजपुजन यात्रेचे पूजन केले. नितीन खामगळ, नाना गवळी, ऋषी करभाजन, पंकज लोखंडे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सुकदेव बोदडे (नाना), डॉ.हेमंत येवले, अमोल दुसाणे, अब्दुल गनी खान, अरुण लोखंडे, किशोर माळी, यशवंत जासुद, निखील पाटील, गौरव पाटील, पत्रकार अय्युब पटेल, पत्रकार सुनील गावडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !