कोरोना योद्धा आमदार निलेश लंके यांचे भुसावळात मराठा समाजातर्फे स्वागत
भुसावळ : पारनेर-नगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व महाराष्ट्राचे कोरणा योद्धा निलेश लंके हे भुसावळात एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त् यांचा मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, मराठा समाजाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, संजय आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, अॅड.तुषार पाटील, मराठा समाजाचे अध्यक्ष किरण पाटील, छावा संघटनेचे ईश्वर पवार, कृष्णा शिंदे, योगेश पाटील, सचिन पाटील, पवन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अॅड.तुषार पाटील यांनी आमदार निलेश लंके यांचे मराठा आरक्षण या विषयावर पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले.





