मनसे आंदोलनाचा परीणाम : बर्हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गाच्या दुरुस्तीला सुरूवात
यावल : बर्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गाची दुरवस्था थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी श्राध्द आंदोलन केल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी सकाळी 10 वाजेपासून खड्डे बुजवण्यास सुरूवात केल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आंदोलनाची दखल : रस्ता डागडूजीला सुरूवात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष किशोर नन्नवरे , विभागाचे अध्यक्ष आबिद कच्छी, तालुका उपाध्यक्ष शाम पवार, आकाश चोपडे, प्रतीक येवले, कमलेश शिर्के, राज शिर्के, गणेश माळी, कुणाल बारी यांनी सोमवार, 13 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता बर्हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गावर मोठ-मोठे खड्डे रास्ता रोको आंदोलन करीत श्राद्ध घातल्याने खळबळ उडाली होती. या आंदोलनाची यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहाँगीर तडवी यांनी तत्काळ दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात या खड्डे पडलेल्या मार्गावर खडीकरणाव्दारे दुरूस्ती करण्यात येत असल्याने मनसेच्या पदधिकारी यांच्यावतीने आभार मानले जात आहे. तत्काळ या मार्गावरील नादुस्त झालेल्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.




