भुसावळातील नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी पर्यावरणाचा संदेश देत घरीच केले गणरायाचे विसर्जन
भुसावळ : पर्यावरणाचा संवर्धनाचे महत्व लक्षात घेत भुसावळातील नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी पाच दिवसीय उत्सवानंतर घरीच गणरायाला भक्तीभावाने निरोप दिला. नगरसेवक ठाकूर यांच्याकडे सालाबादाप्रमाणे गणरायाची स्थापना करण्यात आल्यानंतर पाच दिवसीय उत्सवानंतर मंगळवारी गणरायाला कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. नदी वा तलावात गणरायाचे विसर्जन केल्यानंतर होणारे जलप्रदूषण लक्षात घेत घरीच मोठ्या बादलीत शुद्ध पाणी घेतल्यानंतर भक्तीभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी देशावरील कोरोनाचे संकट टळावे तसेच मुसळधार पावसामुळे बळीराजाचे नुकसान झाल्याने त्यांना संकटातून बाहेर निघण्यासाठी उभारी मिळावी, अशी मनोभावे प्रार्थनाही नगरसेवक ठाकूर यांनी केली. यावेळी नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, भारती ठाकूर, एकता ठाकूर, प्रीती भोजने, लिलावती साळी आदींची उपस्थिती होती.





