मुंबईतील महिलेवर अमानुष अत्याचार करून खून करणार्‍या नराधमाला फाशी द्यावी


वरणगावात भाजपा महिला आघाडीचे पोलीस प्रशासनाला निवेदन

वरणगाव : मुंबईतील साकीनाका भागात 30 वर्षीय महिलेवर नराधमांनी बलात्कार करून गुप्तांगात रॉड घुसविल्याने महिलेचा मृत्यू झाला. भरदिवसा महिलांवर अत्याचार होत असून राज्यात महिला सुरक्षित नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे झोपेचे सोंग घेत असून कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. याला महाविकास आघाडी जबाबदार असून महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍या आरोपीला तत्काळ फाशी द्यावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष प्रणिता पाटील चौधरी यांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे केली. यावेळी वरणगाव पोलीस स्टेशनबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शहराध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी, रुपाली काळे, मंदा थटार, उषा पवार, शारदा गंभीर माळी, गंगुबाई माळी, नीता तायडे, मनीषा माळी, सविता माळी, वर्षा बढे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक शेख, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, सरचिटणीस गोलू राणे, उपाध्यक्ष नटराज चौधरी, भाजयुमोचे शहराध्यक्ष संदीप भोई, सरचिटणीस आकाश निमकर, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष किरण धुंदे, प्रसिद्धी प्रमुख राहुल जंजाळे, रमेश पालवे, आवेश खान, डॉ.प्रवीण चांदणे, शहराध्यक्ष डी.के.खाटीक, मुस्लिम भाई अन्सारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अपयशी महाविकास आघाडीच्या विरुद्ध महिलांनी घोषणाबाजी केली. यावेळी निवेदन ठाणे अंमलदार वर्षा पाटील, अतुल बोदडे, चौहाण उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !