नदीत पडलेल्या बालकाचे प्राण वाचवणार्या भुसावळातील क्रीडा शिक्षकांचा सन्मान
क्रीडा शिक्षक महासंघ व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा उपक्रम
भुसावळ : शहरातील संत गाडगेबाबा हिंदी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक एन.एन.पाचपांडे यांचा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ जळगांव जिल्हा व पंचायत समिती, शिक्षण विभाग भुसावळ, यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. झेडटीएस परीसराचत श्री विसर्जनादरम्यान आर्यन यादव या चिमुकल्याचा पाचपांडे यांनी जीव धोक्यात घालून जीव वाचवला होता तर दुदैवाने चिमुकल्याच्या बहिणीचा मृत्यू झाला होता.
यांची सत्कारप्रसंगी उपस्थिती
सत्कारवेळी गटविकास अधिकारी विलास भाटकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी.डी.धाडी विस्ताराधिकारी किशोर वायकोळे, तुषार प्रधान, माजी सभापती सुनील महाजन, ना.गो.पाटील, सदानंद उन्हाळे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रदीप साखरे, प्राचार्य एन.बी.किरंगे, प्राचार्य व्ही.एस.पाठक, क्रीडा शिक्षक व उपमुख्याध्यापक रमण भोळे, तालुका समन्वयक बी.एन.पाटील, प्रमोद शुक्ला, विलास पाटील, एम.के.वाणी, डी.आर.धांडे, आनंद पाठक, सुनील वर्मा, कांतीलाल कुलकर्णी, अनिल माळी, आर.सी. चौधरी आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक रमण भोळे तर आभार बी.एन.पाटील यांनी मानले.




