रेल्वे कामगार शिष्टमंडळातर्फे भुसावळचे नूतन डीआरएम नवीन पाटील यांचा सत्कार
भुसावळ : रेल्वेचे नूतन एडीआरएम नवीन पाटील यांचा गुरुवारी रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळने भेट घेवून सत्कार केला. यावेळी भुसावळ विभागातील कामगारांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. एडीआरएम नवीन पाटील यांनी संबधित विभागीय अधिकार्यांबरोबर चर्चा करून समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले. यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, राजेश लखोटे, प्रीतमकुमार टाक, कमलाकर बाणाईत, अरविंद थोरात, सुरेंद्र यादव, डी.डी.पाटील, गोपाल उमाळे, अमन झनके उपस्थित होते.





