बोदवड शहरात आमदार चंद्रकांत पाटील यांची लाडू तुला
बोदवड : शहरातील मुक्ताई भवनात आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी आमदारांची बोदवड नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आमदारांची लाडूतुला केली. शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये रस्ता व पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मुक्ताई भवनात नगरसेवक, मुस्लिम कमेटी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, युवा सेना, शिवसेना यांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
बोदवड तालुक्यातील पाणीप्रश्न सोडवणार : आमदार
यावेळी विरेंद्रसिह पाटील, हितेश पाटील, ईश्वर जंगले, अफसर खान यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, शहराचा शेवटच्या घटकापर्यंत विकास करण्यात येईल. तालुक्यासह शहरात समांतर पाणीपुरवठा योजना आणून पाणीटंचाई दूर करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शहराच्या विकासासाठी 10 कोटींच्या निधीतून कामे झाल्याचे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा पती सईद बागवान, नगरसेवक नितीन चव्हाण, देवा खेवलकर, सुनील बोरसे, इरफान शेख, असलम शेख, आनंदा पाटील, विजय पालवे, धनराज गंगतीरे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, मुक्ताईनगर प्रमुख छोटू भोई, हर्षल बडगुजर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




