उत्कृष्ट कार्याबद्दल भुसावळ विभागाला महाव्यवस्थापक शील्ड प्राप्त
भुसावळ : मध्य रेल्वेच्या 66 व्या क्षेत्रीय रेल्वे सप्ताह सोहळ्यानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल भुसावळ विभागाला पाच शील्ड प्राप्त झाल्या आहेत. महाव्यवस्थापक अनिल लाहोटी यांच्याहस्ते भुसावळ विभागाचे डीआरएम एस.एस.केडिया यांनी या शील्ड स्वीकारल्या. या शील्ड वाणिज्य विभाग, परीचालन विभाग, कार्मिक विभाग, सर्वश्रेष्ठ कार्यकुशलता, भांडार विभाग या विभागांना या शील्ड शुक्रवारी प्राप्त झाल्या आहेत. याप्रसंगी भुसावळ डीआरएम एस.एस.केडिया, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, वरीष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापक आर.के.शर्मा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अरुण कुमार यांची मुख्यालयात उपस्थिती होती.





