मोहराळेत विजेची तार पडून 2 शेळ्यांचा मृत्यू


यावल : तालुक्यातील मोहराळे येथे विजेचा तार पडून 2 शेळ्या जागीच ठार झाल्या. सुदैवाने कुटुंबातील सदस्य थोडक्यात बचावले. त्यामुळे गावातील वीज तारांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. मोहराळे येथे गावातील ज्ञानेश्वर लोहार यांचे वेल्डिंग दुकान आहे. या दुकानाच्या छतावर शुक्रवारी पहाटे अचानक विजेची तार तुटून पडली. त्यात दुकानाजवळ बांधलेल्या दोन शेळ्या जागीच ठार झाल्या. या शेळ्यांच्या शेजारीच खाटेवर लोहार झोपले होते. ते मात्र या दुर्घटनेतून सुदैवाने वाचले. विजेची तार तुटून पडल्याचे लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा त्यांच्याही जिवावर बेतले असते. या घटनेची माहिती वायरमन उस्मान तडवी यांना देण्यात येऊन तत्काळ वीज प्रवाह बंद करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !