सीआरएमएस संघटनेचे डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन


भुसावळात केंद्र शासनाच्या रेल्वे विरोधी धोरणाचा सीआरएमएस पदाधिकार्‍यांनी नोंदवला निषेध

भुसावळ : भारत सरकार रेल्वे मंत्रालयाच्या धोरणांचा सीआरएमएस संघटनेतर्फे शहरातील डीआरएम कार्यालयाबाहेर सीआरएमएस संघटनेतर्फे निषेध नोंदवण्यात आला. रेल्वेतील खाजगीकरण, स्टेशन तसेच गाड्या विक्रीचे धोरणाच्या विरोधात नॅशनल फेडरेशन ऑफ़ इंडियन रेल्वे मॅनच्या आवाहनानुसार सीआरएमएसने शुक्रवारी डीआरएम कार्यालयासमोर निदर्शने केली. मध्य रेल्वेतील सीआरएमएसचे अध्यक्ष भटनागर यांच्या नेतृत्वात रेल्वेच्या पाचही मंडळांंमध्ये 13 ते 18 सप्टेंबर विरोध सप्ताह सुरु आहे. या आंदोलनाचे पडसाद भुसावळातील दिसून आले. शुक्रवारी भुसावळ मंडळचे मंडळ अध्यक्ष व्ही. के. समाधीया, मंडळ सचिव एस. बी. पाटील यांच्या नेतृत्वात डीआरएम कार्यालयाबाहेर व्दारसभा घेण्यात आली.

रेल्वे गाड्या व्रिक्री करण्याच्या धोरणाचा निषेध
यावेळी कामगारांना विरोधी धोरणांबद्दल कल्पना देण्यात आली तसेच भारत सरकार रेल मंत्रालयाच्या स्टेशन तसेच गाड्या विकण्याच्या धोरणाबद्दल तीव्र विरोध करण्यात आला. रेल्वेचे खाजगीकरण हे रेल्वेच्या व रेल्वे कामगारांच्या हिताचे नसून यात देशाचे मोठे नुकसान होईल म्हणून रेल्वे कामगारांनी याचा तीव्र विरोध करून राष्ट्र व रेल्वेला वाचवण्याची जवाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले. दररोज 2.5 कोटी प्रवाश्यांना घेऊन जाणारी रेल्वे निरुपयोगी कशी ? सर्व प्रवाश्यांना स्वस्त दरात दळणवळण चे साधन उपलब्ध करणारी रेल्वे निरुपयोगी कशी ? वर्ष 2021 -2022 मध्ये 1233 मिलियन टन माल वाहतूक करून देणारी रेल्वे निरुपयोगी कशी ? असे सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले. प्रवाशी गाड्यांच्या खाजगीकरण म्हणजे गरीब प्रवाश्यांना प्रवास करण्यापासून रोखण्यासारखे आहे, असे मत यावेळी मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया यांनी व्यक्त केले. सूत्रसंचलन संजय चौधरी यांनी केले.




यांची आंदोलनास उपस्थिती
मंडळ कार्याध्यक्ष तिवारी, मंडळ समन्वयक एस.के.दुबे, मंडळ संगठक पी.के. रायकवार, नंदकिशोर उपाध्याय, अमरसिंग राजपूत, उमाकांत बावस्कर, पी.के.गुप्ता, किशोर कोलते, विशाल खरे, सुरेश लखोरे, अजय मालवीय, दीपक शर्मा, अय्युब खान, अजित आमोदकर, गणेश सिंग, अजित रंधावा आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !