भुसावळात जय गणेश फाऊंडेशनच्या गणपतीचे सजवलेल्या कुंडात विसर्जन
भुसावळ : शहरातील जय गणेश फाऊंडेशनच्या नवसाच्या गणपतीचे सुरभी नगरातील गणपती मंदिरात पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे व नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याहस्ते सजवलेल्या कुंडात विसर्जन करण्यात आले. जय गणेश फाऊंडेशनच्या नवसाच्या गणपतीची स्थापना कोरोना नियमांचे पालन करीत छोटेखानी स्वरूपात गणपती मंदिरात करण्यात आली. संपूर्ण गणेशोत्सव काळात चित्रकला, वक्तृत्व आदी विविध ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीत भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष धीरज धांडे, सचिव तुषार झांबरे, स्पोर्ट्स क्लब कार्याध्यक्ष चैत्राम पवार, कोषाध्यक्ष प्रवीण पाटील, डॉ.अभय कोटेचा, अनुपसिंग ठाकूर, रवींद्र पाटील, अभिषेक वाणी, हर्षल वानखेडे, रवी जोनवाल, संतोष भंगाळे, शरद लोहार, विशाल आहुजा, सुधीर देशपांडे, महेंद्र महाजन, वामन कोलते, राजू कोलते, पुरुषोत्तम खंडेलवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते. मंदिराच्या आवारातच एका सजवलेल्या कुंडात गणपती विसर्जन पोलीस उपअधीक्षक वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आणि माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीसरातील भाविक उपस्थित होते.





