भुसावळात नगरसेवक पिंटू कोठारींतर्फे गणेशभक्तांना महाप्रसादाचे वाटप


भुसावळ : सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या नगरसेवक पिंटू (निर्मल) कोठारी यांच्यातर्फे शहरातील सुमारे दहा हजार गणेशभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रविवार, 19 रोजी लाडक्या गणरायाला गणेश भक्तांतर्फे साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. यावल रोडवरील तापी नदीकडे बाप्पाच्या विसर्जनासाठी जाणार्‍या तब्बल 10 हजार गणेश भक्तांना साईजीवन सुपर शॉपीचे संचालक निर्मल कोठारी यांच्यातर्फे भाजीपुरी व मसालेदार खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.

उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
कोरोनाच्या कठीण काळात शहरवासीयांसाठी धावून आलेल्या कोठारी यांच्यातर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर दिला जातो. श्री विसर्जनादरम्यानही त्यांनी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. यावल रोडवरील तापीपात्रात विसर्जनासाठी जाणार्‍या व येणार्‍या भाविकांना यावल रोडवरील साईजीवन सुपर शॉपीबाहेर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पुरीभाजी व मसाला खिचडी सोबतच भाविकांना थंडगार पाणीही उपलब्ध करून देण्यात आले. वाहतूक कोंडी होवू नये तसेच वाहतुकीवर परीणाम न होण्यासाठी साईजीवन सुपरशॉपच्या कर्मचार्‍यांनी नियोजन केले. भाविकांसोबतच या उपक्रमात पालिकेतर्फे तैनात जिवनरक्षक दलाचे कार्यकर्ते, पालिका कर्मचारी आदींनाही जागेवर पोच प्रसाद देण्यात आला. या उपक्रमात नगरसेवक निर्मल कोठारी, अजीत कोठारी, प्रवीण घिया, आकाश जोशी, प्रथमेश गुलईकर, दीपक नेमाडे, क्रिश कोठारी, संजय कुकरेजा, गजानन चव्हाण, उमेश पाटील, पवन महाजन, नीलेश वाटोळेकर, किरण मिस्तरी, भुषण काटकर आदींसह साईजीवन सुपर शॉपीच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !