गणरायाच्या मूर्ती विसर्जन बदल्यात मिळाले फळांचे रोप


भुसावळातील ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील यांची संकल्पना : 210 गणेश मूर्तींचे संकलन

भुसावळ : गणरायाची मूर्ती द्या व फळाचे वृक्षरोप भेट घ्या हा उपक्रम मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळातील श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट, ट्रामा आणि डायलिसीस सेंटर व निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील, रघुनाथआप्पा सोनवणे यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आला. 210 गणेश मूर्ती संकलन झाले तर 184 गणेश भाविकांनी फळ झाडे स्विकारली.

गणरायाची मूर्ती देणार्‍या भाविकांना झाड भेट
मुन्सिपल हायस्कूल, जामनेर रोड, भुसावळ या ठिकाणी गणरायाची मूर्ती संकलनासाठी दिल्या त्या कुटुंबाला एक फळाचे झाड भेट देण्यात आले. त्या झाडाचे वर्षभर संगोपन आणि संवर्धन करणार्‍या कुटुंबातील व्यक्तीचे पुढील वर्षी गणेशाच्या आगमनाच्या वेळी सत्कार करण्याचा नियोजन करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी स्वतः त्यांच्या घरी बसविलेल्या श्री गणेशाची मूर्ती या मूर्ती संकलन केंद्रात जमा करून उपक्रमास सुरुवात केली. आयोजक नाना पाटील यांनी फळ झाड भेट दिले याप्रसंगी भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार उपस्थित होते.




यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.गणेश पाटील, डॉ. अमोल पाटील, डॉ.नितीन पाटील, डॉ.लक्ष्मीकांत नागला, डॉ.महेश पांगळे, डॉ.कुशल पाटील व श्री रीदम मेडिकलचे संचालक गौतम चोरडिया, नगरपरीषदेचे कर्मचारी चंद्रकांत येवले, राजेंद्र पाटील, पोलीस विभागाचे राजेंद्र पाटील मूर्ती संकलन केंद्रात सक्रिय होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय गाडेकर, ज्ञानेश्वर घुले, सुरेंद्रसिंग पाटील, गिरीश भंगाळे, नगरपालिका अभियंता गौरव अहिरे, लोकेश ढाके, आरोग्य अधिकारी वसंत राठोड यांचे या उपक्रमास सहकार्य लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !