सर्व कर्मचारी खरे योद्धा : न्या.आर.आर.अहिर
भुसावळ : सर्व कर्मचारी खरे योद्धा असून त्यांच्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणावर कोरोनाविषयी जनजागृती झाली व विक्रमी प्रमाणात लसीकरण झाले, अशी भावना न्या.आर.आर.अहिर यांनी येथे व्यक्त केली. पॅन इंडिया अवेरनेस व आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत भुसावळ तालुका विधी सेवा प्राधिकरणामार्फत पंचायत समितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले. अॅड.विक्रम शेळके यांनी ‘आणिबाणीच्या परीस्थितीत सर्वांचे कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी उमेश पाटणकर होते. सूत्रसंचालन महिला प्रतिनिधी अॅड.जास्वंदी भंडारी यांनी केले. किशोर पिंगाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. कैलास काळे, राजेंद्र फेगडे, गीता नागराज, कल्पना रावल यांचे सहकार्य लाभले.
शहरात पाच ठिकाणी शिबिराचे आयोजन
शहरात पाच ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात जिल्हा न्यायालयात न्या.एस.पी.डोरले यांच्या उपस्थितीत झालेल्या शिबिराला अॅड.तुषार पाटील व अॅड.राजेश मालवीय उपस्थित होते. नगरपरीषदेत झालेल्या शिबिराच्या अध्यक्षस्थानी न्या.के.एस.खंडारे होते. अॅड.धनराज मगर व अॅड.धीरज शंकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. दुय्यम कारागृहात झालेल्या शिबिराच्या अध्यक्षस्थानी न्या.द.मा.डोमाळे होते. पुरूषोत्तम पाटील, अॅड.ए.ए.खान, अॅड.कैझर भारमल यांची उपस्थिती होती. रेल्वे न्यायालयात झालेल्या शिबिरात न्या.हरीभाऊ देशिंगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी अॅड.शेख नवाब अहमद व अॅड.वैशाली साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, एस.आर.पाटील, जगदीश मानकर, पी.एल.बेदरकर, किशोर पिंगाणे यांनी यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.




