भुसावळात रेल्वे जीएम लाहाेटी यांच्या हस्ते टाॅवर वॅगन, डयुएल इंजीन लाेकार्पण
भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) अनिल कुमार लाहोटी यांनी बुधवारी भुसावळ येथे भेट देऊन स्थानकाची पहाणी केली. यावेळी त्यांनी बॅटरीवर चालणार्या इंजिनाचे आणि रेल्वेच्या पीओएच कारखान्यात निर्मीती करण्यात आलेल्या टॉवर वॅगनचे उदघाटन करून लोकार्पण केले. यावेळी त्यांच्या समवेत डीआरएम एस.एस. केडीया व अन्य अधिकारी उपस्थित होते. मध्य रेल्वेचे जीएम केडीया हे बुधवारी भुसावळ विभागाच्या दौर्यावर आले होते. त्यांनी सकाळी भुसावळ रेल्वे स्थानकाचे निरीक्षण केले. यावेळी एसी वेटींग हॉलची पहाणी केली. नवीन पादचारी पूल तयार करण्यात आला त्याची पाहणी केली. सरकते जिने, गार्ड लॉबी आणि बसस्थानकाकडील मुख्य प्रवेशद्वारांची पाहणी केली. यावेळी आरक्षण तिकीट खिडकीची माहिती जाणून घेतली.
जीएम यांच्याहस्ते इंजिनाचे उद्घाटन
यावेळी प्लॅटफॉर्म चारवर उभ्या करण्यात आलेल्या डयुएल डीझेल व बॅटरीवर चालणार्या इंजिनाची निर्मिती केली असून त्या इंजिनाचे उद्घाटन करण्यात आले. हे इंजिन फक्त शंटींगची कामे करणार आहे. ज्या भागात इलेक्ट्रीक नाही, त्या भागातून गाडी आणणे, गाडी नेणे आदी कामे हे इंजीन करणार आहे. यावेळी रेल्वे स्थानकाची पहाणी करून झाल्यावर जीएम लाहोटी यांनी विद्युत इंजीन कारखाना (पीओएच) येथे भेट देऊन पाहणी केली. कारखान्यातील विविध विभागांना भेटी दिल्यात. तेथील कामाची पहाणी केली. रेल्वे स्थानकावर स्थानक डायरेक्टर जी.आर. अय्यर यांनी स्थानकाची माहिती दिली. यावेळी डीआरएम केडीया, एडीआरएम नवीन पाटील, वरिष्ठ परिचालन प्रबंधक आर.के. शर्मा, रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त सूरज गुरव, डीसीएम बी. अरूणकुमार यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागाची पहाणीकरून त्यांनी समाधान व्यक्त केले.



टॉवर वॅगचे उदघाटन
रेल्वे बोर्डाच्या सूचनेवरून येथील पीओएच कारखान्यात 13 टॉवर वॅगन बनविण्यात येत आहे. त्यातील पहिल्या टॉवर वॅगनचे उदघाटन जीएम लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. अन्य टॉवर वॅगनच्या कामाची माहिती जीएम लाहोटी यांनी कारखाना प्रबंधक शिवराम यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी कारखान्याच्या पहाणी दरम्यान मोठ्या प्रमाणावर कारखान्यातील अधिकारी उपस्थित होते.
लोको पायलट यांच्याशी चर्चा
लोको पायलट व असिस्टन लोको पायलट यांनी लाल सिग्नल सांभाळावा, लाल सिग्नल पास हाईल अशी गाडी चालवू नये, यासाठी रेल्वे तर्फे लोको पायलट यांच्यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाणार असल्याचे जीएम लाहोटी यांनी सांगितले, यावेळी त्यांनी दोन, तीन लोको पायलटांशी चर्चा केली. त्यांच्या काय समस्या आहे का, याची माहिती जाणून घेतली.
स्वच्छतेसाठी 10 हजाराचे बक्षीस
रेल्वे स्थानकातील स्वच्छतेवर जीएम लहोटी यांनी अधिक भर दिला. स्थानकावरील स्वच्छता पाहून त्यांनी 10 हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले. याच प्रमाणे स्थानक चकाचक ठेवावे, अश्या सूचना त्यांनी स्टेशन डायरेक्टर अय्यर यांना दिल्यात. तसेच बॅटरीवरील इंजीन तयार केल्यामुळे येथील एमओएच शेडला सुध्दा 20 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले.


