खंडोबावाडी देवस्थानात 27 रोजी संत निवास व जलकुंभ भूमिपूजन सोहळा


फैजपूर : खान्देशातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले फैजपूर नगरीचे आराध्य दैवत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान, खंडोबावाडी, फैजपूर मंदिर परीसरात भव्य-दिव्य असे संत निवास उभारण्यात येणार असून यासह पाण्याचा जलकुंभ देखील बनविण्यात येणार आहे. या कामासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून खंडोबा देवस्थानसाठी 40 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती संस्थानचे गादिपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांनी पत्रकार परीषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत नागा गोविंददास महाराज, प्रा.जी.पी.पाटील व मुख्याध्यापक गणेश गुरव उपस्थित होते.

सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन
या निधीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. सोमवार, 27 सप्टेंबर रोजी संत निवास तसेच जलकुंभाचा भुमिपूजन होत आहे. आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या सोहळ्यात संत निवास भुमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलकुंभ भूमिपूजन खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते होत आहे.




यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
दीपप्रज्वलन सतपंथ संस्थान गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, स्वामिनारायण गुरुकुल, सावदा उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदास महाराज, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते होणार आहे. जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, आमदार राजूमामा भोळे, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार रमेश चौधरी, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, जि.प.सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्षा नयना चौधरी, माजी सभापती भरत महाजन, नरेंद्र नारखेडे, प्रांताधिकारी कैलास कडलग, डीवायएसपी कृणाल सोनवणे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, मध्य रेल्वेचे मुन्ना सिंग तोमर यांच्यासह सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारीं इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !