हावडा एक्स्प्रेसमधून महिलेची पर्स लंपास


भुसावळ : महिला प्रवासी झोपली असल्याची संधी चोरट्यांनी साधत 30 हजार रुपयांची रोकड असलेली पर्स लांबवली. हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये ही घटना बुधवारी घडली. हावडा अमदाबाद एक्स्प्रेस या गाडीच्या एस-8 या डब्यातील सीट 8 व 16 वर बसून बिलासपूर ते सुरत असा प्रवास बलराम सूर्यवंशी (रा.कोरीया, छत्तीसगढ) हे पत्नीसह करीत असताना पत्नीला झोप लागल्यानंतर चोरट्यांनी पर्स लांबवली. ही घटना बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ घडली होती. सूर्यवंशी यांना जाग आल्यावर पर्स नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ जीआरपी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा बडनेरा जीआरपी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !