भुसावळात खाजगी रुग्णालयाच्या दुमजली इमारतीवरून रुग्णाची उडी


भुसावळ : शहरातील खाजगी रुग्णालयात आयसीयू कक्षात उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाने शुक्रवारी सकाळी दुसर्‍या मजल्यावरून उडी घेत पळ काढल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी धाव घेत रुग्णाला अडवल्यानंतर त्याची समजूत काढत पुन्हा रुग्णालयात दाखल केले. शहरातील रीदम हॉस्पीटलमधील आयसीयूमध्ये दोन दिवसांपासून 45 वर्षीय रुग्णावर उपचार सुरू होते. या रुग्णाने शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मागील बाजूच्या खिडकीचे काच तोडून खाली उडी घेतल्याने खळबळ उडाली. रुग्णालयातून उडी मारल्यानंतर हा रूग्ण थेट रस्त्यावर पळत सुटला. मात्र त्या रुग्णाच्या आप्तांनी पाठलाग करून त्याला पुन्हा समजावून रिदम हॉस्पीटलमध्ये भरती केले.

रुग्णावर उपचार सुरू : डॉ.नितीन पाटील
श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 45 वर्षीय रुग्णाला विषबाधा झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागाच्या क्युबिकमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवार, 24 सप्टेंबर रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास त्यांनी हॉस्पिटलच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याबाबतीत हॉस्पिटलकडून त्वरीत बाजारपेठ पोलिस ठाण्यात कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. सध्या रुग्णाची मानसिक स्थिती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रुग्णालयाचे डॉ.नितीन पाटील म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !