जेसीआय क्लबतर्फे भुसावळातील वाहतूक पोलिसांचा सन्मान


भुसावळ : जेसीआय क्लबतर्फे जेसी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात शहरातील वाहतूक पोलिसांना तसेच विविध स्पर्धेतील गुणवंतांना क्लबतर्फे सन्मानीत करण्यात आले. शहरातील पंचायती वाड्यात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ.निलेश झंवर व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या रजनी सावकारे यांची उपस्थिती होती. क्लबच्या अध्यक्षा निकीता अग्रवाल, संगीता अग्रवाल, सेक्रेटरी वर्षा जैन, प्रोजेक्ट डायरेक्टर ज्योती दरगड, सोनल झंवर, आभा दरगड, राखी झंवर, सुनीता अग्रवाल, जयश्री अग्रवाल, श्रृती लाहोटी, हेमा बेहरा, भारती राठी, दीपा पटेल, योगीता झंवर, रेखा व्यास आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचलन ज्योती दरगड व सोनल झवर यांनी तर आभार क्लबच्या अध्यक्षा निकिता अग्रवाल यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !