अट्टल दुचाकी चोरटे जाळ्यात : 19 चोरीच्या दुचाकी जप्त


जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : दुचाकी चोरीनंतर वाहन गहाण ठेवण्याचा आरोपींनी सुरू केला होता प्रघात

जळगाव : अट्टल दुचाकी चोरटे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले असून आरोपींच्या ताब्यातून तब्बल चोरीच्या 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या. दुचाकींची चोरी केल्यानंतर आरोपी कमी किंमतीत या दुचाकी गहाण ठेवून पैसे मिळवत होते मात्र गुन्हे शाखेला याबाबत माहिती कळताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरीफ शरीफ तडवी (24, रा.गणेश नगर, पहूर) व चेतन संजय चव्हाण (23, रा.लोहारा, ता.पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून पाचोरा हद्दीतील आठ, जळगाव एमआयडीसी हद्दीतील तीन, जामनेर व पिंपळगाव हरेश्‍वर हद्दीतील प्रत्येकी दोन व पहुर हद्दीतील एक चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, एएसआय अशोक महाजन, एएसआय रवी नरवाडे, हवालदार महेश महाजन, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल उमेशगिरी गोसावी, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, कॉन्स्टेबल हेमंत पाटील , चालक हवालदार दीपक चौधरी, नाईक मुरलीधर बारी, अशोक पाटील
आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !