वाळू माफियांची दादागिरी : पोलीस कर्मचार्याला चिरडले
सोलापूर : वाळू माफियांच्या वाहनाने पोलिस कर्मचार्याला चिरडल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी-शिरशी रोडवरील हॅट्सन डेयरी येथे घडली. शनिवार, 25 रोजी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. गणेश प्रभू सोनलकर असे मयत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
वाहनाला हात देताच अंगावर आणले वाहन
लोकअदालत असल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनलकर हे समन्स बजावण्यासाठी गेले होते. गोनेवाडीचे पोलीस पाटील संजय मेटकरी यांना हॅट्सन डेयरी येथे या म्हणून गणेश सोनलकर हे वाट पाहत तिथे थांबले होते. याचवेळी समोरून येणार्या वाळूच्या टेम्पोला हात केला असता वाळू टेम्पो चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घालून चिरडले असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनातील अधिकारी हॉस्पिटलमध्ये धावले. दरम्यान, या घटनेतील आरोपींना लवकरच पकडण्यात येणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी सांगितले.
