भुसावळात उद्या असंघटीत कामगारांसाठी ई श्रम कार्ड नोंदणी अभियान


भुसावळ : शहरातील महात्मा फुले नगर आरोग्य केंद्रात नगरसेवक युवराज लोणारी व माजी नगरसेविका मीना लोणारी यांच्यातर्फे असंघटीत कामगारांसाठी ई श्रम कार्ड नोंदणी अभियान महामहोत्सव रविवार, 26 रोजी होत आहे. सकाळी नऊ वाजता महोत्सवाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे करतील. अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे असतील. सरकारने असंघटीत कामगारांच्या सुूरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देतांना येणार्‍या अडचणींसाठी ई श्रम कार्ड नोंदणी अभियान महामहोत्सवाचे आयोजन केले आहे. यात लहान शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार, वीट भट्टीवरील काम करणारा मजूर, भाजीपाला विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, अ‍ॅटो रीक्षा चालक, आशा कामगार, सामान्य सेवा केंद्र चालक, पशूपालन करणारे, लेदर कामगार, घरगुती कामगार, फळ विक्रेते, हातगाडी ओढणारे, घरकाम करणारे कामगार, दूध उत्पादक शेतकरी, स्थलांतरीत कामगार हे नाव नोंदणी करू शकतात. नाव नोंदणीसाठी आधारकार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुक सोबत आणावे, असे आवाहन नगरसेवक युवराज लोणारी यांनी केले आहे


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !