भुजबळ करून टाकू ही म्हण बदलली : मंत्री छगन भुजबळ
जळगावात पत्रकार परीषद : ओबीसी आरक्षणासाठी राज्यसरकार न्यायालयात जाणार
जळगाव : गेल्या दोन वर्षांत एखाद्याला धमकावण्यासाठी विरोधक तुझा छगन भुजबळ करून टाकू अशा धमक्या दिल्या जात होत्या. महाराष्ट्रात तर अलीकडे ही म्हणच प्रसिद्ध झाली होती. खडसेंनाही या म्हणीप्रमाणेच त्रास दिला; परंतु यातून मी बाहेर पडलो आहे. आणि ही म्हणदेखील बदलली आहे. आता त्याच जुन्या अंदाजातील भुजबळ विरोधकांना दिसतील, असा चिमटा भुजबळ यांनी येथे काढला. ओबीसी आरक्षण परीषदेनिमित्त ते रविवारी शहरात आले होते. भुजबळ यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आरक्षण, जातनिहाय जनगणना या विषयावर ओबीसी संघटनांसह राज्य सरकारही लवकरच न्यायालयात जाणार आहे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी लढा उभारणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जळगावात आयोजित पत्रकार परीषदेत दिली.
- ही बातमी वाचली का- भुसावळातील तरुणाचा नशिराबादमध्ये खून : पोलिसांनी केली तिसर्या आरोपीला अटक








