आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेची नवी तारीख लवकरच होणार जाहीर


नाशिक : न्यासा कम्युनिकेशन नामक कंत्राटी कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे राज्याच्या आरोग्य खात्यावर भरती परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली होती. या परीक्षेची पुढील तारीख ठरवण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लवकरच बैठक बोलावली आहे. आरोग्य खात्यातील क आणि ड संवर्गाच्या 6 हजार 205 पदांसाठी 25 आणि 26 सप्टेंबरला लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल आठ लाख उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना हॉल तिकिटे न मिळणे, चुकीची हॉल तिकिटे मिळणे असे घोळ झाले होते. ठेकेदार कंपनी न्यासा कम्युनिकेशनने शुक्रवार, 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्याने परीक्षा पुढे ढकलावी लागली, असा खुलासा करत राज्य सरकारने हात झटकले होते. मात्र हा निर्णय कळताच उमेदवारांचा रोष पाहून आरोग्य विभागावर माफी मागण्याची नामुष्की आली. मात्र यामुळे अनेक परीक्षार्थींचे हाल झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !