नशिराबाद येथून चोरट्यांनी अॅपे रीक्षा लांबवली
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथून बस स्थानकासमोर पार्किंगला लावलेली प्रवासी अॅपे रीक्षा अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी रीक्षा चालकाच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. निखील सुभाष अडकमोल (24, रा. नशिराबाद) बसस्थानकाच्या मागे हा आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्याकडे (एम.एच. 19 सी.डब्ल्यू.2298) क्रमांकाची अॅपेरीक्षा आहे. 17 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 18 सप्टेंबर पहाटे पाच वाजेच्या दरम्यान बसस्थानकाजवळ लावलेली दीड लाख रुपये किमतीची अॅपे रीक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यांनी परीसरात शोधाशोध केली परंतु रीक्षा आढळून आली नाही. अखेर शनिवार, 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलिस ठाण्यात निखिल अडकमोल यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात अॅपे रीक्षा चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

