जळगावात भाजीपाला विक्रेत्यांचे मोबाईल लांबवले


जळगाव : जळगाव-औरंगाबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील भाजीपाला मार्केटमधून चोरट्यांनी तीन विक्रेत्यांचे मोबाईल लांबवले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र विश्वनाथ सोनार (49, रा.भादली बुद्रुक, ता.जि. जळगाव) हे भाजीपाला विक्रीचे काम करतात. शनिवार, 25 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते जळगाव औरंगाबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट येथे भाजी खरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल तर सोबत असलेल्या दोन सहकार्‍यांचा 16 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असे एकूण 26 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी रवींद्र सोनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक इम्रान सय्यद करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !