यावलमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी पदाधिकार्यांची शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी घोषणाबाजी
यावल : शहरातील भुसावळ टी-पॉईंटवर सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरूध्द आंदोलन करण्यात आले व शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा परीषद काँग्रेसचे गटनेता प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.मुकेश येवले, भगतसिंग पाटील, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, शेख सईद, काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अॅड.देवकांत पाटील, श्यामराव मेघे, वढोदा सरपंच संदीप सोनवणे, जलील पटेल, भरत चौधरी, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, नगरसेवक सैय्यद युनूस, रसुल शेख, नगरसेवक समीर मोमीन, नगरसेवक मनोहर सोनवणे, शेख असलम शेख नबी, बापू जासुद, कामराज घारू, समीर खान, अनिल जंजाळे, हाजी गफ्फार शाह, करीम मणियार, कलिमोद्यीन शेख, प्रदीप पाटील, विनोद पाटील, सत्तार तडवी, शेख नईम, अशपाक शाह, शेख सकलेन, बशीर तडवी, लिलाधर सोनवणे, राजेंद्र पाटील, विक्की गजरे, नियुक्ती धांडे, अयाज खान, किरण तडवी, कमलाकर जाधव, प्रवीण साळुंके, अयुब शेख, भरत भालेराव, चेतन सोनवणे, हमीद तडवी, सुपडू तडवी, सिकंदर तडवी, जितु पाटील, वसंत चौधरींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.








