भुसावळात भाजपातर्फे पं.दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन


भुसावळ : भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे एकात्ममानव वाद तथा अंत्योदयचे प्रणेते, उत्कृष्ट संघटक, प्रखर राष्ट्रवादी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे प्रतिमेचे पूजन केले.

यांची कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती
कार्यक्रमास माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, प्रा.दिनेश राठी, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण भावसार, पंडितराव सुरवाडे, जयंतीलाल सुराणा, लक्ष्मण सोयंके, राजु खरारे, राजेंद्र आवटे, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, खुशाल जोशी, शहर सरचिटणीस रामशंकर दुबे, संदीप सुरवाडे, ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी, जिल्हा चिटणीस शैलजा पाटील, रजनी सावकारे, महिला आघाडी शहराध्यक्षा अनिता आंबेकर, वैद्यकीय आघाडीचे डॉ.सनी जैन, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष अर्जुन खरारे, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष धनराज बाविस्कर, अनुसूचित जाती शहराध्यक्ष राहुल तायडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, पवन बुंदेले, नरेंद्र बर्‍हाटे, जयंत माहुरकर, प्रवीण इखणकर, शिशिर जावळे, गौरव आवटे, युवा मोर्चा सरचिटणीस नंदकिशोर बडगुजर, दिनेश दोधानी, गोपीसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !