जि.प.सिंचन विभागातील गौण खनिज घोटाळ्यांची व्याप्ती प्रचंड : घोटाळ्याच्या चौकशीसाठी पीआरसी समितीला साकडे
पंचायत राज कमिटीसमोर जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे यांचा तब्बल 100 पानी तक्रार अर्ज सादर
जळगाव : जळगाव जिल्हा परीषदेतील सिंचन विभागात झालेल्या घोटाळ्याच्या सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी पीआरसी समितीकडे तब्ब्ल शंभर पानी अर्ज सादर करून केली. गेल्या एक वर्षापासून गौणखनिजाची जी रक्कम मक्तेदाराच्या बिलातून कपात करून शासनास भरणा गेली पाहिजे होती ती रक्कम संबंधित अधिकारी व मक्तेदार यांनी संगनमत करून, बनावट पावत्या जोडून मक्तेदाराने हडप केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
- ही बातमी वाचली का- अल्पवयीन मुलीवर गँगरेप : पीडीतेने बाळाला जन्म देताच विहिरीत फेकले
जि.प.प्रशासनाकडून कारवाईच नाही
याबाबत जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी तब्बल 20 वेळा अर्ज करून तसेच प्रत्येक जलसंधारणाच्या व सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करून सुद्धा संबंधितावर कार्यवाही करून सदर गौण खनिजाची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याची विनंती केल्यानंतर अद्यापपर्यंत जिल्हा परीषद प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याचे सावकारे यांनी म्हटले आहे. या प्रकरणांमध्ये कार्यवाही का होत नाही ? हा संशोधनाचा विषय आहे व त्याबाबत शंका घेण्यास वाव आहे. या संदर्भात पुरावे म्हणून जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांनी कागद पत्रे सोबत जोडत पीआरसी समितीकडे तक्रार दिली. मुळात घोटाळ्यांची व्याप्ती मोठी याबाबतची सर्व महत्त्वाचे कागदपत्रे सावकोर यांनी शंभर पानी अर्जासोबत जोडलेली आहेत. पंचायतराज कमिटीने या घोटाळ्याची तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व शासनाची फसवणूक करणार्या अधिकारी व मक्तेदारांना कडक शासन करावे, अशी मागणी पल्लवी सावकारे यांनी केली आहे.

