जळगावात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या


जळगाव : शहरातील सम्राट कॉलनी परीसरातील 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, 27 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीला आली याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लक्ष्मण अशोक जाधव (27, रा.न्यू सम्राट कॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

तरुणाच्या आत्महत्येने हळहळ
मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या तरुणाची पत्नी कौटुंबिक वादामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे लक्ष्मण जाधव यांना नैराश्य आले. सोमवार, 27 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी आई शर्मिलाबाई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. गल्लीतील योगेश परदेसी याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लक्ष्मण यास दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रावणी हुंबे यांनी मयत घोषीत केले. मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लक्ष्मण जाधव यांच्या पश्चात पत्नी रूपाली, चार वर्षाचा मुलगा प्रणव, आई शर्मिलाबाई, राम व शुभम हे दोन भाऊ आणि विवाहित बहिण असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !